सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न
सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० : घाटकोपर पोलिस ठाण्यात कार्यरत एका सहायक निरीक्षकाने पोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (ता. २९) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. बाळकृष्ण नाणेकर असे फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सहायक निरीक्षकाचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या दीड वर्षांपासून घाटकोपर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या नानेकर यांची काही दिवसांपूर्वी पुणे येथे बदली झाली होती. त्यामुळे त्यांनी पुणे येथे कुटुंबीयांसह राहण्याचा निर्णय घेतला; मात्र घाटकोपर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना पुणे येथे जाण्याची परवानगी मिळत नव्हती. गेल्या काही दिवसांपासून अधिकाऱ्यांकडून त्यांना विविध प्रकारे त्रास दिला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे निराश झालेल्या नाणेकरांनी सोमवारी रात्री फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.