दर्शन सोळंकी आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल

दर्शन सोळंकी आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३० : आयआयटी मुंबईचा विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी (ता. २९) ४८३ हून अधिक पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटीने इतर विद्यार्थी, आयआयटीमधील अनेकांचे जबाब नोंदवले असून त्याचाही आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. आरोपपत्रात एसआयटीने अरमान खत्री याला मुख्य आरोपी बनवले आहे. अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात अरमानविरुद्ध विशेष न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

दर्शनने १२ फेब्रुवारी २०२३ रोजी आत्महत्या केली होती. दर्शनच्या मृत्यूच्या तीन आठवड्यांनंतर मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाला त्याच्या खोलीतून एक सुसाईड नोट मिळाली. यामध्ये ‘अरमानने मला मारले आहे’ अशी एक ओळ लिहिलेली पोलिसांना सापडली. तपासादरम्यान पोलिसांना अरमानचा दर्शनशी वाद झाल्याची माहिती मिळाली होती. अरमानच्या धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य दर्शनने केले होते. त्यानंतर पेपर कटरचा धाक दाखवत दर्शनला अरमानने मारण्याची धमकी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com