यंदाही भिवंडी एसटी स्थानकात पाण्यात

यंदाही भिवंडी एसटी स्थानकात पाण्यात

भिवंडी, ता. ३१ (बातमीदार) : भिवंडी एसटी बस स्थानकात दरवर्षी पावसाचे पाणी साचून बस थांब्याच्या ठिकाणी तळे बनत आहे. त्यावर महामंडळाच्या ठाणे कार्यालयातून भिवंडी स्थानकात केवळ तात्पुरती दुरुस्तीकामे केल्यामुळे परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे यंदाही पावसाळ्यात एसटी स्थानकात पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर वेळीच ठोस उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
महामंडळाच्या भिवंडी बस आगाराला ५० वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असून स्थानकाची मूळ इमारतदेखील धोकादायक झाली आहे. तसेच इतर बांधकामांचीदेखील मुदत पूर्ण झाल्याने महापालिकेने ही इमारत धोकादायक असल्याची नोंद करून व्यवस्थापनास नोटीस बजावली आहे. त्यामुळे जास्त प्रवासी असलेले कल्याण व ठाण्याच्या प्रवाशांना इमारतीबाहेर उभे करून त्यांना बस मध्ये बसविले जात आहे. तसेच दरवर्षी आगारात साचलेले पावसाचे पाणी जाण्यासाठी अथवा पाण्याचा निचरा होण्यासाठी आगारातील गटारे महापालिकेच्या गटारांना न जोडल्याने पावसाळ्यात आगाराच्या जागेत पाणी साचून तळे बनते. त्या साचलेल्या पावसाच्या पाण्यात बसेस उभ्या केल्याने बसच्या टायरचे नुकसान होते. तर प्रवासी, चालक आणि वाहकांना त्या पाण्यातून चालत जावे लागते. या बाबत गेल्या दहा वर्षांपासून नागरिक नियंत्रकाकडे तोंडी तक्रार करतात. याची दाखल घेत आगरप्रमुखांनी ठाणे विभागीय कार्यालयास कळविले असता डांबरीकरण केले जाते. मात्र पाण्याचा निचरा होईल असे डांबरीकरण न झाल्याने त्या डांबरीकरणात खड्डे बनून त्यामध्ये पाण्याचे डबके साचते. सध्या आगारातील डांबरीकरण उखडले असून धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
-----
आगारात यापूर्वी केलेल्या डांबरीकरण उखडले असून झालेल्या खड्ड्यात रिबीट टाकले आहे. भिवंडी आगाराची जागा खोलगट भागात असल्याने २-३ महिन्यांपूर्वी या ठिकाणी रिबीट टाकलेले आहे. आगारात पाणी साचते ते पाणी आगाराबाहेर काढण्यासाठी मार्ग अथवा गटारे करण्याची कारवाई सुरू आहे.
- इम्रान पटेल, आगारप्रमुख, भिवंडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com