रामिम संघाचे उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर शिवशक्ती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामिम संघाचे उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर शिवशक्ती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
रामिम संघाचे उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर शिवशक्ती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

रामिम संघाचे उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर शिवशक्ती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

sakal_logo
By

‘रामिम’चे उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर
‘शिवशक्ती जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

शिवडी, ता. ३१ (बातमीदार) ः गिरणी कामगार चळवळीत ४० वर्षे निःस्पृह आणि निरलस वृत्तीने कार्यरत असणारे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ ऊर्फ अण्णा शिर्सेकर यांना श्री शिवशक्ती सामाजिक प्रतिष्ठानच्या विद्यमाने मानाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परळच्या मनोहर फाळके सभागृहात मंगळवारी (ता. ३०) पार पडलेल्या १८ व्या राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात मुंबईचे निवृत्त पोलिस महासंचालक सुधाकर सुराडकर यांच्या हस्ते शिर्सेकर यांना पुरस्कार देऊन त्यांच्या त्यागमयी सेवेबद्दल गुणगौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
उरणमधील ज्येष्ठ समाजसेवक भाऊसाहेब पाटील यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भालचंद्र पाटील, मुंबईचे सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त आर. एन. तडवी, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात समाजातील सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या समाजसेवकांना उद्योगरत्न, शिक्षण संगोपन आणि सहकाररत्न सेवाकार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कवी फरजा डांगे यांनी आपल्या कविता सादर करून कार्यक्रमाची रंजकता वाढवली.