भगवान भोईर स्कूल संघ अजिंक्य

भगवान भोईर स्कूल संघ अजिंक्य

डोंबिवली, ता. ३१ (बातमीदार) : भगवान भोईर हायस्कूल (बीबीएचएस) संघाने मोहन क्रिकेट क्लब संघावर १७ धावांनी मात करत १२ वर्षांखालील मुलांच्या डॉ. साळगावकर क्रिकेट स्पर्धेचे विजेतपद पटकावले. केएफसीए क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक प्रज्योत नंदकुमार सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीबीएचएस संघाने या स्पर्धेत प्रथमच सहभाग घेतला होता.
डॉ. साळगावकर क्रिकेट स्पर्धा शनिवारी पश्चिमेतील वायले नगर येथील युनियन क्रिकेट ग्राऊंडवर पार पडली. या स्पर्धेत ठाणे, मुंबईसह अन्य शहरांतील १६ संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बीबीएचएस संघाने निर्धारित २० षटकांत ४ बाद १४९ धावांचे लक्ष्य उभारले. सत्यनारायण घुगे याने ७४ धावा तसेच सन्मित कोथमिरे ३४ धावा करत संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना मोहन सीसी संघाचा डाव १३१ धावाच करू शकला. मोहन सीसी संघातील वीर सचदेवने केलेल्या ३० धावा आणि अथर्व शिंदेच्या ३४ धावा वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी निराशा केली. स्पर्धेत पाच सामन्यांत १६८ धावा करणारा बीबीएचएस संघाचा सत्यनारायण घुगे सर्वोत्कृष्ट फलंदाज, तर पाच सामन्यांत दहा बळी घेणारा आर्यन पाटील हा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण सन्मित कोथमिरे व अमर बिसू कर्मा यांची स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती केएफसीए क्रिकेट अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक प्रज्योत सकपाळ यांनी दिली.

डोंबिवली : विजेता भगवान भोईर स्कूलचा (केएफसीए) संघ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com