कल्याणमध्ये थकीत ई चलन वसुली

कल्याणमध्ये थकीत ई चलन वसुली

कल्याण, ता. ३१ (बातमीदार) : कल्याणसहित राज्यात विविध शहरांत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ई-चलनद्वारे दंड आकारला जातो. मात्र अनेक वाहनचालक तो दंड भरत नसल्याने लाखो रुपये थकबाकी आहे. यावर वाहतूक पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून कल्याण पूर्वमध्ये अशा वाहनचालकांकडून सुमारे लाखांची थकबाकी वसूल केली आहे.
कल्याण पूर्व वाहतूक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या पथकाने २९ आणि ३० मे असे दोन दिवस विशेष मोहीम राबवली. यात नियम मोडणाऱ्या चालकांवर ई-चलनद्वारे थकीत असलेल्या दंडाची वसुली करण्यात आली. यात अवजड वाहने, कार, दुचाकी चालकांकडून थकीत ई-चलन रोखीने, क्यूआर कोड, तसेच ऑनलाईन पद्धतीने वसूल करण्यात आले. यात एक पोलिस निरीक्षक, तीन पोलिस उपनिरीक्षक, सहा पोलिस अमलदार आणि तीन वार्डन यांचा सहभाग होता.

अशी झाली वसुली
कारवाईमध्ये ४६ हजार ३०० रुपये रोखीने, एक लाख ६ हजार २५० रुपये क्यूआर कोडने, तर ६५ हजार ३०० रुपये कार्डने अशी एकूण दोन लाख १७ हजार ८५० रुपयांचे थकीत ई-चलन वसूल करण्यात आले.

थकीत दंड वसुलीची ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे. वाहनचालकांनी आपले ई-चलन दंड थकबाकी असेल तर तो त्वरित भरावा.
- रवींद्र क्षीरसागर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com