महापालिका मुख्यालयात दरमहा पेन्शन अदालत

महापालिका मुख्यालयात दरमहा पेन्शन अदालत

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उतार वयात निवृत्तिवेतनविषयक प्रश्नांसाठी महापालिकेत वारंवार खेटे घालावे लागतात. त्यांच्या या फेऱ्या वाचाव्यात, तसेच सेवानिवृत्ती वेतनविषयक बाबी लवकरात लवकर मार्गी लावावी यासाठी पालिका प्रशासनाने दर महिन्याला पेन्शन अदालतीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या अध्यक्षतेखाली या अदालतीचे कामकाज पार पडणार आहे. यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या पेन्शन अदालतीमुळे दिलासा मिळणार आहे.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन झाल्यावर सकाळी १०.३० च्या सुमारास पेन्शन अदालत घेतली जाणार असल्याचे कल्याण-डोंबिवली महापालिकेने जाहीर केले आहे. यासाठी विहीत नमुन्यात १५ दिवस आधी दोन प्रतीत आपली पेन्शनविषयक तक्रार, निवेदन अर्ज महापालिका सामान्य प्रशासन विभाग मुख्यालयात पाठविणे आवश्यक राहील. ही तक्रार व निवेदन अर्ज वैयक्तिक स्वरूपाची असावीत. पेन्शनधारक/कुटुंब निवृत्तीधारक यांनी या पेन्शन अदालतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे. तथापि आजारपणामुळे, वयोमानानुसार किंवा अपरिहार्य कारणास्तव ते येऊ शकत नसतील तर त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीला लेखी स्वरूपात प्राधिकृत करावे आणि प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने आपणास प्राधिकृत केल्याचे पत्र कार्यालयीन कामाच्या ८ दिवस अगोदर पोहचविणे आवश्यक आहे. या पेन्शन अदालत चौकशीची अथवा न्यायप्रविष्ठ प्रकरणे, आश्वासित सुधारित योजनेबाबत थकबाकी मिळणेबाबतची प्रकरणे, सहाव्या-सातव्या वेतन आयोगाची थकबाकी बाबतची प्रकरण, विहीत नमुन्यात नसलेले व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्वीकृत केले जाणार नाहीत. तथापि पेन्शन अदालतीमुळे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी वर्गास एक प्रकारचा दिलासा प्राप्त होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com