विक्रोळी, नाहूर आणि विद्याविहार रेल्वेस्थानकांचा होणार विकास

विक्रोळी, नाहूर आणि विद्याविहार रेल्वेस्थानकांचा होणार विकास

मुंबई, ता. ३१ ः वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या विक्रोळी, नाहूर आणि विद्याविहार रेल्वेस्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. रेल्वेस्थानकांतील पुलांच्या गर्डरची कामे मार्गी लावली जात आहेत. विकासकामे झपाट्याने सुरू आहेत, अशी माहिती ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी दिली.

मुंबईत आणि विशेषतः ईशान्य मुंबईत अनेक विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत. काही कामे प्रगतिपथावर आहेत. काही अंतिम टप्प्यात सुरू आहेत. ईशान्य मुंबईचा संपूर्ण कायापालट करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी माहिती कोटक यांनी दिली. ईशान्य मुंबईतील नागरी सुविधांची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
एलबीएस रोड, गोळीबार रोड, अंधेरी, घाटकोपर लिंक रोड आदी कामे मार्गी लावण्यात येत आहेत. विक्रोळी, नाहूर आणि विद्याविहार रेल्वेस्थानकातील पुलांच्या गर्डरची कामे सुरू आहेत. विद्याविहार रेल्वेस्थानकात नुकताच शंभर मीटर लांब व एक हजार टन वजनाचा गर्डर यशस्वीपणे टाकण्यात आला, अशी माहिती कोटक यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सेवा, सुशासन व गरिबांचे सरकार म्हणून महिला, बेरोजगार, शेतकरी, विद्यार्थी आदींसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना, रस्ते व पुलाची उभारणी, महिलांसाठी रोजगार, उज्ज्वला गॅस योजना, मोफत अन्नधान्य आदींबाबतची माहिती खासदार कोटक यांनी माहिती दिली.

स्थानकांतील सोयी-सुविधांकडे लक्ष
उपनगरीय रेल्वेस्थानकांत प्रवाशांसाठी सरकत्या जिन्याची सुविधा आणि अन्य सोयी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या केंद्र-राज्य सरकार व मुंबई महापालिका यांच्या माध्यमातून सोडवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी चार वर्षांपासून रस्ते, पूल, कचरा विल्हेवाट, शौचालये आदी विकासकामे करीत आहोत, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com