पावरलूम मालकाची १० लाखांची ऑनलाईन फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावरलूम मालकाची १० लाखांची ऑनलाईन फसवणूक
पावरलूम मालकाची १० लाखांची ऑनलाईन फसवणूक

पावरलूम मालकाची १० लाखांची ऑनलाईन फसवणूक

sakal_logo
By

भिवंडी, ता. ३१ (बातमीदार) : शहरातील अशोक नगरमधून एका पावरलूम मालकाच्या बँक खात्यातून साडेदहा लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात ॲप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनेश कुमार छाजेड (वय ४६) हे शहरातील अशोकनगर परिसरातील जैन मंदिराजवळील इमारत क्र. २७ मध्ये राहत आहेत. दरम्यान २९ मे रोजी त्यांच्या मोबाईलवर फोन क्लोन व क्लोन फोन नावाने ॲप्लिकेशन नकळतपणे डाऊनलोड होऊन प्रथम त्याच्या बँकेतील खात्यामधून ८ लाख ५० हजार रुपये डेबिट झाल्याचा संदेश आला. त्यानंतर पुन्हा सायंकाळी २ लाख रुपये डेबिट झाल्याचा संदेश आल्याने त्यास स्वतःची फसवणूक होत असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी तूर्तास शहर पोलिस ठाणे गाठून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे ६६ (ब) अन्वये गुन्हा दाखल करून भामट्याचा शोध सुरू केला आहे.