पुस्तक प्रकाशन विषयी मोफत मार्गदर्शन

पुस्तक प्रकाशन विषयी मोफत मार्गदर्शन

पुस्तक प्रकाशनाविषयी मोफत मार्गदर्शन
मुलुंड, ता. ३१ (बातमीदार) ः लिहिणाऱ्या प्रत्येकाला आपले पुस्तक प्रकाशित व्हावे, अशी इच्छा असते; पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अनेकदा फसवणूक होते. नामवंत प्रकाशक नवोदित कवी-लेखकांची पुस्तके प्रकाशित करतातच असे नाही. अशा वेळी दर्जेदार लिहिणारे लेखक-कवी मागे पडतात. अशा महाराष्ट्रातील लेखक-कवींना प्रा. प्रज्ञा पंडित ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. त्यांची वीस पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ‘इंग्रजी माझ्या खिशात’ पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे नुकतेच शिरीष कणेकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मुंबईतील लेखिका आणि समीक्षक असलेल्या प्रा. प्रज्ञा पंडित ‘पुस्तक प्रकाशन कसे करावे’ यासंबंधी रविवारी (ता. ४) ११ वाजता विनामूल्य मार्गदर्शन शिबिर घेणार आहेत. गुगल मीटद्वारे होणाऱ्या शिबिरासाठी learnwithpradnyapandit@gmail.com या मेल आयडीवर संपर्क करावा, असे आवाहन प्रा. प्रज्ञा पंडित यांनी केले आहे.


फोटो ओळ
मुंबई ः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अवमानप्रकरणी ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटविरोधात बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेच्या वतीने मुंबई पोलिस आयुक्तालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ इत्यादी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com