अंनिसतर्फे शनिवारी व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंनिसतर्फे शनिवारी व्याख्यान
अंनिसतर्फे शनिवारी व्याख्यान

अंनिसतर्फे शनिवारी व्याख्यान

sakal_logo
By

नवी मुंबई (वार्ताहर) : जून महिना हा विविध परीक्षांच्या निकालांचा, मेडिकल इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचा असतो. या वेळी समाजात गुणवत्ता आणि आरक्षण यासंबंधी उलट सुलट चर्चा सुरू होते. यासंदर्भात ''गुणवत्ताशाहीचे अवडंबर'' या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या विशेषांकाचे प्रकाशन शनिवारी (ता. ३) ज्येष्ठ अर्थतज्‍ज्ञ आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात (दिल्ली) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डॉ. सुखदेव थोरात यांचे गुणवत्ताशाहीचे अवडंबर या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी यांनी हा अंक संपादित केला आहे. हा ऑनलाईन कार्यक्रम शनिवारी (ता. ३) सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फेसबुक पेजवर लाईव्ह होणार आहे. यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजीव देशपांडे, मुक्त दाभोलकर, राहुल थोरात, अनिल चव्हाण यांनी केले आहे.