एएमएफआयच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एएमएफआयच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन
एएमएफआयच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

एएमएफआयच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

sakal_logo
By

मुंबई, ता. ३१ ः ‘द असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’च्या (एएमएफआय) नव्या प्रीमायसेसचे बीकेसी येथे उद्घाटन करण्यात आले. ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी-बूच यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. हे नवीन कार्यालय वांद्रे येथे बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील नमन कॉर्पोरेट लिंकमध्ये सातव्या मजल्यावर आहे.

उद्योग, गुंतवणूकदार आणि वितरकांना अनुकूल वातावरण प्रदान करणे याबाबत एएमएफआय प्रतिबद्ध आहे. याचे प्रतिबिंब या नव्या कार्यालयात पडते. या कार्यालयाच्या जवळच ‘सेबी’चे कार्यालय असल्याने शहरातील व्यावसायिक आणि भागधारकांना सोयीचे होणार आहे.

याप्रसंगी माधवी पुरी म्हणाल्या, ‘एएमएफआय’चे बीकेसीतील हे नवीन कार्यालय म्युच्युअल फंड इंडस्ट्रीजच्या वाढीसाठी पोषक आहे. उद्योग व्यावसायिकांसाठी, सहकार्यासाठी, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी हे कार्यालय एक चैत्यनदायी केंद्र म्हणून काम करेल. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल मी एएमएफआयचे अभिनंदन करते आणि त्यांच्या भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा देते.

एएमएफआयचे अध्यक्ष ए. बालासुब्रमणियन म्हणाले की, ‘सेबी’च्या अध्यक्षांच्या हस्ते एएमएफआयच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन झाल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. हे नवीन कार्यालय भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाला प्रोत्साहन आणि बळकट करण्याच्या आमच्या सततच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. या नव्या कार्यालयाच्या माध्यमातून एएमएफआय सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि सदस्यांना, भागधारकांना सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध राहील.

एएमएफआयचे सीईओ एन. एस. वेंकटेश म्हणाले, या नव्या कार्यालयातून आमची म्युच्युअल फंड आणि भागधारकांविषयीची बांधिलकी दिसते. भारतीय म्युच्युअल फंड इकोसिस्टम बळकट करण्याच्या आणि गुंतवणूकदारांचे शिक्षण आणि जागरूकता वाढवण्याच्या आमच्या दृष्टिकोनाचा हा एक पुरावा आहे.