जलशक्ती अभियानाच्या कामांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवा : सिंगला

जलशक्ती अभियानाच्या कामांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवा : सिंगला

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ३१ : जलशक्ती अभियानाअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवावे. तसेच या कामांमुळे किती भूजल साठा वाढला याची माहिती ठेवावी, अशा सूचना केंद्रीय निती आयोगाच्या सदस्या जागृती सिंगला यांनी आज दिल्या. तसेच त्यांनी जिल्ह्यातील जलशक्ती अभियान व राष्ट्रीय जल मिशनअंतर्गत गेल्या वर्षभरात झालेल्या व यावर्षी सुरू असलेल्या जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, पारंपारिक आणि इतर जलकुंभ आणि टाक्यांचे नूतनीकरण, संरचनेचा पुर्नवापर आणि पुनर्भरण, गाळ काढणे, पाणलोट विकास, सघन वनीकरण आदी कामांचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, केंद्रीय पथकातील शास्त्रज्ञ वैष्णवी परिहार, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. भाऊसाहेब दांगडे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात सन २०२३ मध्ये जलसंधारण व जलपुनर्भरणाची एक हजार १९१ कामे, पारंपारिक आणि इतर जलकुंभ आणि टाक्यांचे नूतनीकरणाची १७९ कामे, जलसंरचनेचे पुनर्वापर व पुनर्भरणाची ३२० कामे, पाणलोट विकासाची १५२ कामे सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मृद व जलसंधारण विभागमार्फत सन २०२३ या वर्षात चेक डॅमची १९ कामे तर लघु पाटबंधारे विभागामार्फत २४ कामे हाती घेण्यात आली आहेत. अमृत सरोवर योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागामार्फत घेण्यात आलेल्या ७५ कामांपैकी ४६ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पाणीपुरवठा विभागामार्फत पावसाच्या पाण्याचे पुनर्भरणाची एकूण ३९ कामे हाती घेण्यात आली असून त्यातील २४ कामे पूर्ण झाली आहेत. जलजीवन मिशनअंतर्गत जुन्या योजनांची दुरुस्ती व नवीन योजनांची अशी ७०० कामे हाती घेण्यात आली असून त्या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. सर्व कामे डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


पाणलोट विकास, जलसंधारणाची कामांमुळे तसेच पर्जन्य जल पुनर्भरणामुळे व तलावांमधील गाळ काढल्यामुळे किती पाणी साठा होतो, भूजल पातळी वाढली आहे का याची माहिती ठेवावी. तसेच दुरुस्त केलेल्या जलस्त्रोते पुन्हा नादुरुस्त होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. प्रत्येक कामांचे जिओ टॅगिग करावे.
- जागृती सिंगला, सदस्या केंद्रीय निती आयोग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com