कल्याणमध्ये ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्ये ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा
कल्याणमध्ये ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा

कल्याणमध्ये ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा

sakal_logo
By

कल्याण, ता. १ (बातमीदार) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील ज्येष्ठ शिवसैनिक कक्षांतर्गत (भगवा कट्टा) कल्याणमधील ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा कल्याणमध्ये उत्साहात पार पडला. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे सल्लागार ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडला. कल्याण पश्चिममधील शांताराम साटम, चंद्रशेखर देशपांडे, प्रदीप साळवी, प्रवीण बिवलकर, प्रशांत वैद्य, सुभाष कुळकर्णी या ज्येष्ठ शिवसैनिकांच्या प्रयत्नाने मेळावा पार पडला. यावेळी सुमारे २०० ते २२५ ज्येष्ठांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. सर्व ज्येष्ठांचे स्वागत गुलाबपुष्प, पेढा, गळ्यात भगवा गमछा, शिवबंधन बांधून स्वागत करण्यात आले. यावेळी ठाणे, मुंबईमधून ज्येष्ठ शिवसैनिक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.