
शेफ दीपा अवचट यांचा सत्कार
शेफ दीपा अवचट यांचा सत्कार
मुंबई, ता. १ ः गोव्याचे खाद्यपदार्थ आणि संस्कृतीचा प्रसार भारताबरोबरच विदेशात केल्याबद्दल प्रसिद्ध शेफ आणि लेखिका दीपा अवचट यांचा नुकताच राज्यपालांच्या हस्ते राजभवनावर सत्कार करण्यात आला. राजभवनात नुकताच गोवा राज्य स्थापना दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते दीपा अवचट यांना गौरविण्यात आले. ‘आम्ही गोवेकर’ संस्थेतर्फे समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील ‘गोवा पोर्तुगीजा’, ‘दिवा महाराष्ट्राचा’ आणि ‘दक्षिण कल्चर करी’ हॉटेल रेस्टॉरंटच्या दीपा अवचट सहसंस्थापक आहेत. त्यांनी गोवा आणि महाराष्ट्रातील अनेक परंपरागत खाद्यपदार्थ सर्वत्र लोकप्रिय केले आहेत. त्यांना यापूर्वी वर्ल्ड असोसिएशन ऑफ शेफ सोसायटीतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
फक्त फोटो ओळ
मुंबई ः मुंबई महापालिका आणि मागाठण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्यातर्फे प्रभाग क्र. चार मधील महिलांना निःशुल्क शिलाई मशीन, घरघंटी व मसाला कांडप यंत्रांचे वितरण करण्यात आले. त्यांच्या स्वयंरोजगारासाठी हातभार लागावा म्हणून पालिकेतर्फे नुकताच उपक्रम राबवण्यात आला.