अतिरिक्त १३४० दशलक्ष युनिट वीजखरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिरिक्त १३४० दशलक्ष युनिट वीजखरेदी
अतिरिक्त १३४० दशलक्ष युनिट वीजखरेदी

अतिरिक्त १३४० दशलक्ष युनिट वीजखरेदी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १ : मागील एक आठवड्यापासून मुंबईत उकाडा प्रचंड वाढल्याने विजेची मागणीही वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आता वीज वितरण कंपन्यांनी अतिरिक्त वीज खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) गेल्या तीन महिन्यांत १३४० दशलक्ष युनिट (११०० मेगावॅट) अतिरिक्त वीज खरेदी केली आहे. महावितरणने लघुकालीन कराराच्या माध्यमातून ही वीज खरेदी केली आहे.

महावितरणने ‘पॉवर एक्सचेंज’ सुविधेचाही लाभ घेतला. याद्वारे तीन महिन्यात एकूण ६८४ दशलक्ष युनिट इतकी वीज घेतली. महावितरणने पंजाब व इतर काही राज्यांसोबत केलेल्या पॉवर बँकिंग कराराच्या आधारे तीन महिन्यात एकूण १२०० मेगावॅट वीज उपलब्ध केली. पॉवर बँकिंग करारात महावितरणकडे अतिरिक्त असलेली वीज अन्य राज्यांना दिली जाते व त्या बदल्यात महावितरणला गरज असेल त्यावेळी त्यांच्याकडून वीज घेतली जाते. विजेची गरज पूर्ण करण्यासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पातून १९०० मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती करून पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात मागणीनुसार वीज उपलब्ध नसल्याची समस्या उद्‍भवली नसल्याचे महावितरणने सांगितले.


महिना विजेची मागणी अतिरिक्त वीजखरेदी पॉवर एक्सचेंजवरून पंजाब/पॉवर बँकिंग
(मेगावॅट) (मेगावॅट) (दशलक्ष युनिट) करार (मेगावॅट)
मार्च २४,९८३ ३०० १३९ ५००
एप्रिल २४,३२६ ४०० ३२९ ४५०
मे २४,०४७ ४०० २१६ २५०

उन्हाळ्यात राज्यातील ग्राहकांची विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने मार्च, एप्रिल व मे महिन्यात लघुकालीन करार व पॉवर एक्सचेंजमधून एकूण १३४० दशलक्ष युनिट अतिरिक्त वीजखरेदी केली. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा करण्यात यश आले आहे.
- विजय सिंघल, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महावितरण