पित्याकडूनच मुलीवर लैंगिक अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पित्याकडूनच मुलीवर लैंगिक अत्याचार
पित्याकडूनच मुलीवर लैंगिक अत्याचार

पित्याकडूनच मुलीवर लैंगिक अत्याचार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबईतील बोरिवली पश्चिम परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तिच्या पित्याला एमएचबी पोलिसांनी सोमवारी (ता. २९) रात्री अटक केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आरोपी पीडित मुलीवर अत्याचार करीत होता. याप्रकरणी बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलगी १० वर्षांची असल्यापासून आरोपी घरात कोणीच नसताना मुलीवर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. वारंवार झालेल्या प्रकारानंतर पीडित मुलीने आईला हा प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला, पण आरोपी पित्याने पत्नीला खोटी माहिती दिली. त्यानंतर आरोपी पित्याने मुलीला मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्यावर अत्याचार करीतच राहिला. या त्रासाला कंटाळून अखेर ३ वर्षांनी मुलीने नुकतीच एमएचबी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार प्राथमिक चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी पित्याला राहत्या घरातून अटक केली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.