महावितरणचे राज्यात ३२१४ चार्जिंग स्टेशन

महावितरणचे राज्यात ३२१४ चार्जिंग स्टेशन

मुंबई, ता. २ : महावितरणच्या पुढाकाराने राज्यात एकूण ३२१४ चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. याच योगदानासाठी नुकताच ‘ईव्ही चार्ज इंडिया २०२३’ या नवी दिल्ली येथे आयोजित इलेक्ट्रिक वाहनांविषयीच्या परिषदेत महावितरणला चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांच्या विकासात सर्वोत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या यशाबद्दल कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स (एसएमईव्ही) संस्थेचे महासचिव अजय शर्मा यांच्या हस्ते प्रसाद रेशमे यांनी पुरस्कार स्वीकारला. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन व विजय सिंघल यांच्या नेतृत्वात महावितरणने इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगबाबत यशस्वी कामगिरी केली, असे रेशमे यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी महावितरणला राज्याची ‘नोडल एजन्सी’ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

स्वतःची ६२ चार्जिंग स्टेशन
महावितरणच्या पुढाकाराने राज्यात एकूण ३२१४ चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत; तर महावितरणने राज्यात स्वतःची ६२ चार्जिंग स्टेशन्स उभारली आहेत. यात पुण्यात २३, ठाणे ११, नवी मुंबई १२, नागपूर ६ यासह नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि सांगली या शहरांत ही स्टेशन्स उभारण्यात आली आहेत.

माहितीसाठी मोबाईल ॲप
महावितरणने इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी स्टेशन उभारायचे असेल तर त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळही सुरू केले आहे. तसेच महावितरणच्या ‘पॉवरअप ईव्ही’ या ॲप्लिकेशनचा वापर करून वाहनचालक आपल्या जवळचे चार्जिंग स्टेशन शोधू शकतात, तसेच वाहनाच्या चार्जिंगसाठी या मोबाईल ॲपचा वापरही करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com