वायुवेग पथकांमध्ये लवकरच १८७ इंटरसेप्टर वाहने

वायुवेग पथकांमध्ये लवकरच १८७ इंटरसेप्टर वाहने

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : वाहनांची वाढती संख्या आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन अपघात आणि मृत्यूच्या वाढत्या आकड्यांमुळे राज्य सरकारने गृह विभागाच्या ‘वायुवेग पथकां’मध्ये इंटरसेप्टर वाहन वाढवण्याचे प्रस्तावित केले होते. त्याप्रमाणे नवीन १८७ वाहनांसाठी राज्य सरकारने ३८ कोटी ३३ लाख रुपयांची प्रशासकीय आर्थिक मंजुरी दिली आहे. यामध्ये एका वाहनावर सुमारे २० लाख ५० रुपये खर्च केला जाणार आहे.

रस्ता सुरक्षाविषयक जनजागृतीचे काम परिणामकारक होऊन अपघातांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने रजिस्टर व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलीटी (आरव्हीएसएफ) योजनेंतर्गत राज्य सरकारला ५७ कोटी विशेष बिनव्याजी कर्ज मंजूर केले आहे. त्यापैकी ३८.५० कोटी इतका निधी राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. या निधीतून वायुवेग पथकांसाठी नवीन इंटरसेप्टर वाहने आवश्यक त्या उपकरणांसह खरेदी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्यानंतर राज्य सरकारने वाहन खरेदीचा निर्णय घेतला आहे.

वायुवेग पथकांसाठी १८७ नवीन इंटरसेप्टर वाहने आवश्यक त्या उपकरणांसह खरेदी केले जाणार आहेत. या वाहनांची खरेदी करताना उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या निर्णयातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे, गव्हरमेंट ऑफ महाराष्ट्र पोर्टलवरील अटी व शर्तींनुसार खरेदी प्रक्रियेची विहित कार्यपद्धतीनुसारच वाहन खरेदीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com