एक कोटींचा मद्यसाठा जप्त

एक कोटींचा मद्यसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २ : राज्यात विक्री करण्यास बंदी असलेल्या विदेशी मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर ठाणे राज्य उत्पादन विभागाने शुक्रवारी (ता. २) धडक करवाई केली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कल्हेगाव येथून हा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत एका कंटेनरसह एक हजार ५५७ विदेशी मद्याचे बॉक्स, एक मोबाईल असा एक कोटी १८ लाख ९४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाने दिली.
राज्य उत्पादन विभागाकडून राज्यात बेकायदा बनावट मद्याची वाहतूक व विक्रीच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत असतो. त्यानुसार शुक्रवारीही ठाणे राज्य उत्पादन विभागाने धडक कारवाई केली. राज्य उत्पादन विभागाचे अधीक्षक नीलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल तालुक्यातील कल्हेगाव येथे बेकायदा मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर कारवाई करण्यात आली. यात बनावट विदेशी मद्याचे एक हजार ५५७ बॉक्स आढळून आले. याप्रकरणी वाहनचालक राजशेखर सोमशेखर परगी (वय ४१) व खजाहुसेन दवलसाब हित्तलमनी (वय ५८) या दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com