पुराच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी ४७७ पंप सज्ज

पुराच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी ४७७ पंप सज्ज

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : अतिवृष्टीच्या काळात पूर आल्यास त्याचा उपसा करणारे एकूण ४७७ पंप मुंबई शहर तसेच उपनगरांमध्ये लावण्यात आले आहेत. मुंबईतील सखल भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी या पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पाणी तुंबू नये, यासाठी आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी तसे आदेश दिले होते. त्यानुसार पालिका क्षेत्रात पाणी साचणाऱ्या विविध ठिकाणी मिळून ४७७ पंप लावण्याचे काम पर्जन्य जलवाहिन्या विभागाने पूर्ण केले आहेत.

पावसाळ्याच्या कालावधीत दैनंदिन कामांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, या उद्देशाने ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व कामांचा परिणाम येत्या पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईकरांना परिणामकारक स्वरुपात दिसून येईल, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सांगितले. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या सूचनाही वरिष्ठ प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. सखल भागात २४ तास पंप सज्ज राहतील, ही देखील जबाबदारी समन्वय अधिकाऱ्यांवर असणार आहे.

कोणत्या भागातात किती पंप
सखल भागात पाणी उपसा करणाऱ्यासाठी शहर भागात एकूण १८७ पंप आहेत. पश्चिम उपनगरामध्ये एकूण १६६ पंप आणि पूर्व उपनगरामध्ये एकूण १२४ पंप आहेत. शहर भागात कुलाबा विभागात सर्वाधिक २५ पंप आहेत. तर पश्चिम उपनगरात एफ दक्षिण विभागात ३२, एफ पूर्व विभागात ४७ पंप आहेत. तर पश्चिम उपनगरामध्ये एच पूर्व विभागात ५५ पंप आणि एच पश्चिम विभागात २४ पंप आहेत. तर पूर्व उपनगरात विभागात ४८ पंप आणि एम पश्चिम विभागात २१ पंप आहेत.
-----

समन्वय अधिकारी हे आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातील समन्वयकाकडे या पंपच्या कामगिरीची माहिती वेळोवेळी देणार आहेत. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात पंपांनी किती तास पाणी उपसा केला, यावर लक्ष ठेवणेदेखील शक्य होणार आहे,
- उल्हास महाले, उपआयुक्त (पायाभूत सुविधा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com