‘स्कूप’ वेबसिरीजमधून ‘अंडरवर्ल्ड’ची रहस्यकथा

‘स्कूप’ वेबसिरीजमधून ‘अंडरवर्ल्ड’ची रहस्यकथा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : मुंबईतील अंडरवर्ल्ड आणि पत्रकारिता जगत यांच्या आपसातील संघर्षाचे कथन करणाऱ्या ‘नेटफ्लिक्स’वरील ‘स्कुप’ वेबसीरिजची सध्या मोठी चर्चा होत आहे. ही वेबसीरिज स्कुप पत्रकार जिग्ना व्होरा यांच्या ‘बिहाइंड द बार्स इन भायखळा : माय डेज इन प्रिझन’ या चरित्रात्मक पुस्तकातून प्रेरित आहे. जिग्नावर प्रतिस्पर्धी पत्रकार ज्योतिर्मय डे ऊर्फ जे. डे यांच्या हत्येत सहभाग घेतल्याचा आरोप होता; परंतु न्यायालयाने त्यांची सर्व आरोपांतून मुक्तता केली आहे.

मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार असलेले जे. डे यांची ११ जुलै २०११ रोजी पवई येथील त्यांच्या राहत्या घराजवळ हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने २ मे २०१८ रोजी छोटा राजनसह अन्य ८ जणांना दोषी ठरवले. तसेच छोटा राजन आणि इतर ८ आरोपींना सर्व कलमांतर्गत जन्मठेप आणि २६ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने माजी पत्रकार जिग्ना व्होरा आणि पॉलसन जोसेफ यांची सर्व आरोपांतून मुक्तता केली. खून, गुन्हेगारी कट आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण यांसारख्या आरोपांवर सर्वांना दोषी ठरवण्यात आले.

कोण आहे जिग्ना व्होरा?
जिग्ना व्होरा या माजी पत्रकार असून त्यांनी मुंबईत गुन्हेगारी क्षेत्रातील वार्तांकन केले आहे. जून २०११ मध्ये वरिष्ठ पत्रकार जे. डे यांची हत्या झाली. यात जिग्ना हत्येच्या कटातील संशयितांपैकी एक म्हणून चर्चेत आल्या. त्यांनी काही आठवड्यांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची मुलाखत घेतली होती. या प्रकरणी खटला सुरू असताना जिग्नाला अटक करण्यात आली आणि तिला सहा वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. २०१८ मध्ये तिला सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त करण्यात आले. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी ‘भायखळा : माय डेज इन प्रिझन’मधील आठवण लिहिल्या, ज्या स्कुप या वेबसीरिजचा आधार बनल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com