सुब्बालक्ष्मी शिराळी टिजेएसबीच्या एमडी

सुब्बालक्ष्मी शिराळी टिजेएसबीच्या एमडी

ठाणे, ता. २ : टीजेएसबी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (एमडी आणि सीईओ) सुब्बालक्ष्मी शिराळी यांची गुरुवारी (ता. १) नियुक्ती करण्यात आली. सुब्बालक्ष्मी शिराळी यांनी वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. त्यांनी सीआयएसए आणि सीआयएसएमचे शिक्षण अमेरिकेच्या आयएसएसीए या संस्थेतून घेतले आहे. शिराळी यांना चौतीस वर्षांचा बँकिंगचा अनुभव आहे.

बँकिंगमधील रिटेल बिझनेस, क्रेडिट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रिस्क, ऑपरेशन्स आणि कंप्लायन्स यातील तज्ज्ञ म्हणून सुब्बालक्ष्मी शिराळी ओळखल्या जातात. नोव्हेंबर २०२०पासून सुब्बालक्ष्मी शिराळी मुख्य सरव्यवस्थापक म्हणून टीजेएसबी बँकेत कार्यरत आहेत. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुब्बालक्ष्मी टीजेएसबी सहकारी बँकेला वेगाने प्रगतिपथावर पुढे नेतील, असा विश्वास बँकेच्या संचालक मंडळाने व्यक्त केला.

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे ३१ मे रोजी निवृत्त झाले आहेत. सुनील साठे हे २३ वर्षे टीजेएसबीमध्ये कार्यरत होते. चलन विमुद्रीकरण, जीएसटी कर प्रणाली, जागतिक कोरोना आपत्ती, रशिया - युक्रेन युद्धाचा कालावधी अशा जागतिक अर्थकारणाच्या कठीण काळात बँकेचा नफा सुनील साठे यांनी घसरू दिला नाही. नियोजनपूर्वक बँकेची आर्थिक स्थिती सुस्थिर ठेवून बँकेच्या आगामी काळाची तरतूद केली आहे. सुनील साठे यांनी नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्बलक्ष्मी शिराळी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com