Tue, October 3, 2023

दहशत माजवणाऱ्या गुंडाला अटक
दहशत माजवणाऱ्या गुंडाला अटक
Published on : 2 June 2023, 3:33 am
नालासोपारा, ता. २ (बातमीदार) : नालासोपाऱ्यात चाळमाफियांची खुलेआम दादागिरी समोर आली आहे. अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी आणि दुसऱ्या गटावर दहशत पसरवण्यासाठी गर्दी जमवून, भररस्त्यात पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणारा सराईत चाळमाफिया सीसीटीव्हीत कैद झाला आहे. विरार गुन्हे शाखा कक्ष २ चे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी पथकासह शुक्रवारी (ता. २) गुंडाच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. या गुंडाला पकडून पुढील तपासासाठी पेल्हार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अमानउल्ला मोहम्मद तलत शेख ऊर्फ टायगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून हा नालासोपारा पूर्व वाकनपाडा गरीब नवाज मशीदजवळील राहणारा आहे. आरोपीकडून ५० हजार ५०० रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूसही जप्त केले आहे.