ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक

ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक

मुंबई, ता. २ : कुरिअर कंपनीचा संपर्क क्रमांक ऑनलाईन शोधणे मालाडमधील वृद्ध नागरिकाला चांगलेच महाग पडले आहे. आरोपीने वस्तू व सेवा कर (जीएसटी) भरण्याच्या बहाण्याने ६९ वर्षीय वृद्धाच्या खात्यातून ऑनलाईन एक लाख रुपये काढले. याप्रकरणी मालाड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणी पीडित तक्रारदारांनी १४ मे रोजी बंगळुरू-मुंबई असा प्रवास केला होता. प्रवासातील साहित्य कुरिअरमार्फत पाठवले होते. पीडित व्यक्तीला कुरिअर कंपनीशी संपर्क करण्यासाठी २९ मे रोजी इंटरनेटवर संपर्क क्रमांक शोधला. त्यात समोरील भामट्याने बतावणी करून त्यांची फसवणूक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com