Wed, October 4, 2023

शिळगावालगत अनधिकृत बांधकामावर कारवाई
शिळगावालगत अनधिकृत बांधकामावर कारवाई
Published on : 3 June 2023, 9:35 am
कळवा. ता. ३ (बातमीदार) : शिळ गावातील श्री खरवली देवी मंदिराच्या प्रवेशद्वारालगत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये व देवीच्या भाविकामध्ये नाराजी पसरली होती. ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची आमदार निरंजन डावखरे, बाळाराम पाटील, साहिल पाटील नीतेश भोईर यांनी भेट घेऊन या बांधकामावर कारवाईसाठी निवेदन दिले होते. त्यानुसार नुकतीच या बांधकामावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पूर्ण करण्यासाठी चार ते पाच तास लागले. या कारवाईसाठी दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त प्रीतम पाटील स्वतः उपस्थित होते.