कोंडीमुळे टँकर मालकावर गुन्हा

कोंडीमुळे टँकर मालकावर गुन्हा

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : चेंबूर येथून तळोजा येथे डांबराची वाहतूक करणारा रिकामा टँकर डिझेल संपल्यामुळे सीबीडी येथील उड्डाणपुलाजवळ भररस्त्यात बंद पडला होता. या प्रकारामुळे सायन पनवेल मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे चालकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला असल्याने या प्रकरणी सीबीडी वाहतूक पोलिसांनी टँकरचालकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सायन-पनवेल मार्गावरील सीबीडी येथील उड्डाणपुलालगत चेंबूर येथून तळोजा येथे जाणारा डांबर वाहतूक करणारा रिकामा टँकर बंद पडला होता. टँकरमध्ये पुरेसे डिझेल नसल्याने रात्री पावणेआठच्या सुमारास पुणे लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. नेरूळ एल.पी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने त्यात हजारो वाहने अडकून पडली. या प्रकाराची माहिती सीबीडी वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी टँकरमध्ये डिझेल भरून रात्री ९ च्या सुमारास सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक सुरळीत केली होती. मात्र, या कोंडीमुळे हजारो प्रवाशांना तासभर फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वाहतूक पोलिसांनी वाहनचालकासह लाल साई ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या मालक तसेच मॅनेजरवर विरोधात भादंवि कलम २८३ सह मोटार वाहन कायदा कलम १२२/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------------------------
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर यापुढील काळातदेखील कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करत वाहतूक सुरळीत ठेवण्यास सहकार्य करावे.
- तिरुपती काकडे, पोलिस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com