हृदयविकाराविषयी जनजागृती गरजेची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हृदयविकाराविषयी जनजागृती गरजेची
हृदयविकाराविषयी जनजागृती गरजेची

हृदयविकाराविषयी जनजागृती गरजेची

sakal_logo
By

खारघर, ता. १ (बातमीदार) : हृदयविकारांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी वेळीच उपचार आणि वैद्यकीय सेवा मिळाव्यात, यासाठी विविध उपक्रम राबवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी खारघर येथे केले. या वेळी रुग्णालयात शस्त्रक्रिया केलेल्या मुलांना ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ प्रमाणपत्र सुनील गावस्कर यांच्या हस्ते देण्यात आले.
खारघरच्या श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन वर्षांत जन्मजात हृदयविकाराने पीडित असलेल्या ३४८ मुलांची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. या शस्त्रक्रियेसाठी रोटरी क्लबने ८५ दानशूर व्यक्ती तसेच संस्थांकडून सुमारे एक कोटी ९२ लाख रुपये जमा केले आहेत. जमा झालेल्या पैशातून १४० मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या वेळी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टचे अध्यक्ष सुवेंदू मिश्रा यांनी जन्मजात हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या मुलांच्या उपचारासाठी देणगीदारांकडून १.९२ कोटींचा निधी जमा केल्याचे सांगितले; तर सत्य साई हेल्थ अॅण्ड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष सी. श्रीनिवास यांनी हृदयरोगाच्या उपचारासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टने मदत करून खारीचा वाटा उचलला असल्याची माहिती दिली.