
मध्य रेल्वेची आतापर्यंतची सर्वोत्तम मालवाहतूक!
मध्य रेल्वेची मालवाहतुकीतून
७७८.९५ कोटींची कमाई!
मुंबई, ता. ३ : मध्य रेल्वेने यंदाच्या मे महिन्यात ७.५३ दशलक्ष टनाची विक्रमी मालवाहतूक केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ७.३० दशलक्ष टन मालवाहतूक करण्यात आली होती. त्यात ३.२१ टक्क्यांची वाढ झाली असून आतापर्यंतची ही सर्वोत्तम मालवाहतूक असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
मध्य रेल्वेने गेल्या वर्षी मे महिन्यात ७१७.९० कोटींचे उपन्न मिळवले होते. यंदा ७७८.९५ कोटींचे मालवाहतूक उत्पन्न मिळवले आहे. मध्य रेल्वेने सर्व विभागात मालवाहतुकीत कामगिरी सुधारली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत वाढीव लोडिंग साध्य करू शकली आहे.
मध्य रेल्वेने मे २०२२ मध्ये १७१ रेकच्या तुलनेत यंदा सिमेंट आणि क्लिंकरचे २३६ रेक लोड केले आहेत. मे २०२२ मधील खताच्या ८८ रेकच्या तुलनेत मे २०२३ मध्ये ११४ रेक लोड करण्यात आले. मे २०२२ मधील ६३ रेकच्या तुलनेत यंदा ऑटोमोबाईल्सचे ७४ रेक लोड करण्यात आले. मे २०२३ मध्ये कंटेनर लोडिंगमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.१ टक्के सुधारणा झाली आहे. मे २०२२ मध्ये ७०१ रेकच्या तुलनेत मे २०२३ मध्ये ७५१ रेक लोड करण्यात आले. मे २०२२ मधील १९८ रेकच्या तुलनेत यंदा पेट्रोलियम उत्पादनांचे २१५ रेक लोड केले गेले. मे २०२२ मधील ११५ रेकच्या तुलनेत यंदा लोह आणि स्टीलचे लोडिंग १४८ होते. मे २०२२ मधील ५५ रेकच्या तुलनेत यंदा लोहखनिजाचे लोडिंग ८५ रेकपर्यंत वाढले आहे. मे २०२२ मध्ये लोड केलेल्या आठ रेकच्या तुलनेत डी-ऑईल केकचे १८ रेक लोड केले गेले आहेत.