बीएनएचएसमध्ये होणार समुद्री पक्ष्यांवर कार्यशाळा

बीएनएचएसमध्ये होणार समुद्री पक्ष्यांवर कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) आणि बर्डलाइफ इंटरनॅशनल बीएनएचएसने उत्तर हिंद महासागरातील समुद्री पक्ष्यांवर आधारित कार्यशाळेचे आयोजन केले आहे. राज्य सरकारे तसेच भारत सरकारमधील अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि विविध देशांतील संशोधक या कार्यशाळेत महत्त्वाच्या समुद्री पक्षी क्षेत्र आणि त्यांचे स्थलांतर यावर चर्चा करण्यासाठी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

फोर्ट, मुंबई येथील बीएनएचएसच्या हॉर्नबिल हाऊसमध्ये, ७ ते ९ जून २०२३ दरम्यान ही तीनदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. समुद्रातील महत्त्वपूर्ण पक्षी आणि जैवविविधता क्षेत्रांच्या आयबीए नेटवर्कला पूरक होण्यासाठी तसेच सध्या असलेले आणि भविष्यातील धोके ओळखून संशोधनाच्या गरजांवर चर्चा करण्यासाठी समुद्री पक्ष्यांच्या हालचालींचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी उपलब्ध माहिती (डेटा) एकत्र आणणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. ही कार्यशाळा महत्त्वाची पक्षी क्षेत्रे आणि त्यातील महत्त्वाचे दुवे शोधून, तसेच भविष्यातील व्यवस्थापन आणि संशोधन गरजांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख धोके ओळखून समुद्री पक्षी आणि सागरी संरक्षणाशी संबंधित धोरण आणि निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. भारताच्या सागरी क्षेत्रात समुद्री पक्ष्यांच्या हालचालींचे विहंगावलोकन नकाशाची माहिती सोबत समुद्री पक्ष्यांना असलेल्या महत्त्वपूर्ण धोक्याची माहिती गोळा करणे आणि संवर्धनासाठी आवश्यक कृतीची माहिती देण्यासाठी संशोधनातील कमी ओळखण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची असल्याचे बीएनएचएसच्या उप-संचालक डॉ. पी. सथियासेल्वम यांनी सांगितले.

--------------------------------
कार्यशाळेचे फलित कुनमिंग-मॉन्ट्रियल ग्लोबल जैवविविधता आराखड्याशी संबंधित सध्याच्या धोरणात्मक चर्चेसाठी उपयुक्त ठरेल. ही कार्यशाळा सीएमएसचे सध्याचे अध्यक्ष म्हणून आगामी १४व्या सीएमएस कॉपमध्ये पक्षी संवर्धनासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचे प्रदर्शन करण्यासाठी भारत सरकारला मदत करेल.
- किशोर रिठे, अंतरिम संचालक, बीएनएचएस
--------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com