महिलेची सोन्याची माळ लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेची सोन्याची माळ लंपास
महिलेची सोन्याची माळ लंपास

महिलेची सोन्याची माळ लंपास

sakal_logo
By

डहाणू, ता. ३ (बातमीदार) : भरदिवसा शेतावरून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावू पोबारा केला. डहाणू-चिंचणी रस्त्यावरील वाढवण नाक्याजवळ शुक्रवारी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. डहाणू तालुक्यातील टिघरे पाडा येथील भानुमती काशिनाथ पाटील असे माळ चोरीला गेलेल्या महिलेचे नाव आहे. टिघरे पाडा येथील भानुमती पाटील या शुक्रवारी सायंकाळी शेतावरून आपल्या घरी निघाल्या होत्या. त्याचवेळी बुलेट दुचाकीवरून आलेल्या व हेल्मेट घातलेल्या दोघा चोरट्यांनी भानुमती यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ हिसकावून घेऊन पसार झाले. यातील एका चोरट्याने रुमालाने आपले तोंड बांधले होते. तात्काळ वाणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अल्पेश विसे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पाहून तपास सुरू केला. पळून जात असलेल्या चोरट्याचे चित्र कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून, त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.