सायकल ट्रकची अडथळ्याची शर्यत

सायकल ट्रकची अडथळ्याची शर्यत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबईच्या सायकल ट्रॅकसाठी तानसा पाईप लाईनच्या झोपड्या हटवल्या गेल्या, परंतु सायकल ट्रकची अडथळ्याची शर्यत चालूच आहे. भांडुप जलवाहिनीभोवती सायकल ट्रॅकचा पहिला टप्पा सुरू होईल असे सांगण्यात आले, परंतु तो अद्याप पूर्ण होऊ शकला नाही.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनभोवतीचे अतिक्रमण हटवून तेथे हा अनोखा सायकल ट्रॅक तयार केला जाणार आहे. वाहतूक कोंडीतून दिलासा देण्याठी सायकल ट्रॅकची संकल्पना मांडली गेली. तत्कालिन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रकल्पाला वेग दिला होता; मात्र त्यांतरच्या आयुक्तांनी सायकल ट्रॅकच्या विषयावर फार लक्ष दिले नाही. मुंबईत ४० ते ५० किमीच्या या मार्गावर ४० एंट्री एक्झिट पॉइंट असणार असून १९ रेल्वे स्टेशन, सात मेट्रो स्टेशन्स आणि ४ मोनोरेलची स्टेशन्स या मार्गाशी जोडली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. दोन्ही १० मीटर रुंदीच्या या सायकल ट्रॅकच्या मार्गावर बॉलीवूड थीम पार्क, बायोडायव्हरसिटी कॉरिडॉर आणि पुस्तकांची दुकानेही प्रस्तावित आहेत. सायकल चालवणाऱ्यांसाठी विविध सोयी या मार्गावर देण्यात येणार आहेत. ज्यात सायकल स्टँड, पिण्याचे पाणी, शौचालयाची सुविधाही असेल. पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण दिशेला जोडणारा हा अत्यंत जवळचा मार्ग असेल, अशी घोषणा महापालिकेने केली होती; मात्र यातील सर्व कामे अपूर्ण आहेत.

---
चौथ्या वाहतूक मार्गाची भर
मुंबईत रेल्वे, मेट्रो, रस्ते मार्गावरून वाहतूक केली जाते. त्यात आता या सायकल ट्रॅकमुळे चौथ्या वाहतूक मार्गाची भर पडणार आहे. मुंबईतील पाइपलाइनच्या भोवती अतिक्रमणे आहेत. पाइपलाइनला याचा धोका उद्भवतो म्हणून पाइपलाइनच्या दोन्ही बाजू विकसित करण्याची योजना मुंबई मनपाने आखली होती. त्यानुसार सायकल ट्रॅकची योजना तयार करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com