सत्ता गेल्याने महाविकास आघाडी वैफल्यग्रस्त

सत्ता गेल्याने महाविकास आघाडी वैफल्यग्रस्त

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : महाविकास आघाडीला राज्याच्या लोकांचे काही देणे-घेणे नाही. राज्यातल्या कोणत्याही प्रश्नावर ते बोलत नाहीत, राज्यातील सत्ता गेल्याने ते वैफल्यग्रस्त झाले असल्याची टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. शनिवारी (ता. ३) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनीदेखील याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती देखील पडळकर यांनी दिली.
लोकांनी या महाविकास आघाडीकडे बघायचे आणि ऐकायचेसुद्धा नाकारले आहे. संजय राऊत काय बोलले, अजित पवार काय बोलले, काँग्रेसचे नेते काय बोलले याकडे लोक जास्त गांभीर्याने बघत नसल्याचेही पडळकर यांनी सांगितले. तसेच पंकजा मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत. त्यांचे राज्यभर मोठे काम आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी सर्व राजकीय नेते व लाखो सहकारी येतात. मुंडे यांचे अनेक सहकारी इतर पक्षांत आहेत. तेसुद्धा अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळे या विषयाकडे राजकीय दृष्टीने पाहू नये, असेही पडळकर यांनी यावेळी सांगितले. तसेच इतर पक्षासंबंधी लोकांनी कोणतीही चुकीची वक्तव्ये करू नयेत, असे आवाहन आमदार पडळकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com