विजेचा धक्का लागून सहा वर्षीय मुलीचा मृत्यू

विजेचा धक्का लागून सहा वर्षीय मुलीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : सांताक्रूझमधील वाकोला परिसरात शुक्रवारी मध्यरात्री विजेच्या धक्क्यामुळे एका सहा वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे; तर पाच वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला.

परिसरातील रस्त्यातील दिव्याच्या खांबाला स्पर्श केल्यामुळे या दोघा चिमुरड्यांना विजेचा धक्का बसला. तेहारिन परविन इफ्तेखार असे मृत मुलीचे नाव असून तनिश शिंदे या ५ वर्षीय मुलावर नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धाव घेतली. या वेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या दिव्याच्या खांबाची विद्युत केबल लोखंडी फ्रेमवर पडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी दिली. या खांबाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी खोदकाम केले असल्याचा आरोप एका स्थानिकाने केला आहे. दरम्यान, अदाणी इलेक्ट्रिसिटी कंपनीने या घटनेबद्दल आम्हाला खेद असल्याचे मत व्यक्त केले आहे. या प्रकरणाचा पोलिस प्राथमिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com