Fri, Sept 22, 2023

एकल पालक विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप
एकल पालक विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप
Published on : 5 June 2023, 12:06 pm
एकल पालक विद्यार्थांना शैक्षणिक साहित्यवाटप
घाटकोपर, ता. ५ (बातमीदार) ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शाखाध्यक्ष आणि रस्ते आस्थापना व साधन सुविधा प्रभाग संघटक शरद भावे यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून एस जी ट्युटोरियल क्लासेस येथे एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. या वेळी क्लासेसचे संचालक मारुती जाधव, सत्कर्म फाऊंडेशनचे संचालक दत्तात्रय सावंत आदी उपस्थित होते. शरद भावे हे दरवर्षी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून विविध सामाजिक उपक्रम घेतात. गेली दहा वर्षे ते वाढदिवशी गरजू विद्यार्थांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करत आहेत. वाढदिवशी कोणताही केक व पार्टी अशा कार्यक्रमाचे नियोजन न करता केवळ सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करतो, असे शरद भावे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.