आपत्ती व्यवस्थापनासाठी अग्निशमन यंत्रणा सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपत्ती व्यवस्थापनासाठी अग्निशमन यंत्रणा सज्ज
आपत्ती व्यवस्थापनासाठी अग्निशमन यंत्रणा सज्ज

आपत्ती व्यवस्थापनासाठी अग्निशमन यंत्रणा सज्ज

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. ४ (बातमीदार) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथसह बदलापूर नगरपालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी पुरेशा प्रमाणात साधनसामग्री दिल्याने दोन्ही शहरे आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज झाल्याची माहिती अग्निशमन दल प्रमुख भागवत सोनोने यांनी दिली. सोनोने यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिमेकडील पोलिस, पालिका कर्मचारी आणि नागरिकांच्या उपस्थितीमध्ये शिवमंदिर आणि चिंचपाडा खदान याठिकाणी मान्सूनपूर्व मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. यात पालिकेच्या ताफ्यातील दोन स्पीड बोट, रबर बोट, फायबर बोट, लाईफ जॅकेट लाईफ गार्ड, पूरपरिस्थिती उद्‌भवल्यास बचाव कशाप्रकारे करावा याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. बदलापूरमध्येही बॅरेज धरण आणि गावदेवी तलाव याठिकाणी मॉकड्रील घेण्यात आले.