कल्याणमध्ये ५९१ वीजचोरीचे गुन्हे

कल्याणमध्ये ५९१ वीजचोरीचे गुन्हे

कल्याण, ता. ४ (बातमीदार) : थकबाकीपोटी कल्याण परिमंडळात वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले ग्राहक महावितरणच्या रडारवर आहेत. या ग्राहकांच्या वीजपुरवठ्याची सद्यस्थिती तपासण्यात येत असून अनधिकृत वीजवापर आढळणाऱ्या ठिकाणी कारवाई सुरू आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ५९१ जणांविरुद्ध वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मार्च-२००३ अखेर कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेले तीन लाख सहा हजार ५५ ग्राहक होते. एप्रिल महिन्यात यातील चार हजार ४६७ ग्राहकांनी; तर मे महिन्यात ११ हजार ६२७ ग्राहकांनी बिलाचा भरणा केला; तर अजूनही दोन लाख ९२ हजार ६८४ ग्राहकांकडे २६८ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com