युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू

युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू

कल्याण, ता. ४ (बातमीदार) : आसनगाव परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने वीज वितरण यंत्रणेची मोठ्या प्रमाणात हानी झाली. या नैसर्गिक आपत्तीत २५ विजेचे खांब आणि ३८ किलोमीटर वीजवाहिन्या जमीनदोस्त झाल्या. जवळपास १२७ जणांच्या अभियंता, कर्मचारी व कामगारांच्या पथकाने युद्धस्तरावर दुरुस्तीचे काम करत शुक्रवारी दुपारपर्यंत ही सर्व यंत्रणा उभारून वीजपुरवठा सुरळीत केला. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, कार्यकारी अभियंता राजीव रामटेके, शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्यासह १२७ जणांच्या पथकाने हे दुरुस्तीचे काम पूर्ण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com