मंत्रालयात महाराष्ट्र गीत

मंत्रालयात महाराष्ट्र गीत

पुण्यातील शिक्षिकेने रंगवले
मंत्रालयात महाराष्ट्र गीत

मुंबई, ता. ४ ः ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या पुणे येथील कलाशिक्षिका मयूरी जाधव यांनी नुकतीच मंत्रालयात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ राज्य गीताच्या ओळी सुबकपणे रंगवल्या आहेत. राज्य गीताला मानवंदना म्हणून त्यांनी चित्रकलेचा उपक्रम राबविला. त्यासाठी सरकारचा वनविभाग आणि सांस्कृतिक उपक्रम मंत्रालयाने त्यांना आमंत्रित केले होते.
मयूरी जाधव यांनी कवितेसोबतच महाराष्ट्रातील गड-किल्ले आणि थोर पुरुषांची परंपरा अशा संकल्पनेवर आधारित चित्रही काढले आहे. असा सन्मान मिळाल्याबद्दल जाधव यांनी राज्य सरकारचे आणि संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. जाधव यांनी अनेक चित्रकला प्रदर्शने भरवली आहेत. त्यांनी टाटा समूहातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना ऑनलाईन सत्रांद्वारे चित्रकलाही शिकवली आहे. त्यांनी अनाथाश्रमांमध्ये विनामूल्य चित्रकलेचे वर्गही घेतले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com