Sat, Sept 30, 2023

भिवंडीत दोन अनधिकृत शाळा
भिवंडीत दोन अनधिकृत शाळा
Published on : 4 June 2023, 9:32 am
भिवंडी, ता. ४ (बातमीदार) : ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आणि भिवंडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात तालुक्यातील दोन शाळांना अनधिकृत शाळा घोषित करून त्या शाळा बंद करण्यासाठी संस्था चालकांना नोटीस बजावली होती. मात्र असे असतानाही शाळा सुरूच ठेवल्याने या दोन्ही शाळांच्या संस्था चालकांच्या विरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अग्निमाता इंग्लिश स्कूल पिंपळास (भिवंडी) आणि समर्थ विद्यालय पिंपळनेर (तलाईपाडा, भिवंडी) अशी या शाळांची नावे आहेत. याप्रकरणी शिक्षण विस्तार अधिकारी वैशाली डोंगरे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही शाळा संस्था चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.