मजुराने केली ठेकेदाराच्या भावाची हत्या

मजुराने केली ठेकेदाराच्या भावाची हत्या

नालासोपारा, ता. ४ (बातमीदार) : मजुरीचे पैसे कमी दिल्याच्या रागातून मजुराने ठेकेदाराच्या भावाच्या डोक्यात लाकडी फळी घालून हत्या केली. वसईच्या दिवनमान परिसरातील एका चालू इमारतीच्या बांधकामावर शनिवारी (ता. ३) रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत माणिकपूर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहार राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपीला मुंबई कुर्ला टर्मिनन्स मधून १२ तासांच्या आत बेड्या ठोकल्याची माहिती माणिकपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली.
मोहम्मद मोईन फारुख (वय ३८) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, अरबाज (वय २५) असे आरोपीचे नाव आहे. वसईच्या दिवनमान परिसरात कासा टेरेजा या इमारतीचे काम चालू आहे. या इमारतीच्या कामाचा ठेका मोहम्मद मोईन फारुखी यांच्या मोठ्या भावाने घेतला होता. मजुरीचे काम करणारा अरबाज याची मजुरी ठेकेदाराकडे बाकी होती. ठेकेदार हा गावी गेला असल्याने त्याने मोहम्मद याच्याकडे १० हजार रुपये अरबाजला देण्यासाठी दिले होते; मात्र मोहम्मदने १० हजार न देता ८ हजार दिले होते. दोन हजार देत नसल्याने मोहम्मद आणि आरोपीमध्ये रात्री वाद झाला. याच वादातून आरोपीने लाकडी फळी मोहम्मदच्या डोक्यात घातली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना माणिकपूर पोलिसांना कळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव पाटील, सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बडे यांनी घटनास्थळावर तात्काळ भेट देऊन पंचनामा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com