Sun, Sept 24, 2023

रबाळे एमआयडीसीतील बारवर छापा
रबाळे एमआयडीसीतील बारवर छापा
Published on : 4 June 2023, 11:45 am
नवी मुंबई (वार्ताहर) : रबाळे एमआयडीसीतील मायरा बार अॅण्ड ऑर्केस्ट्रा लेडीज बारवर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट- ३ ने छापा मारला होता. या कारवाईत ३७ महिला वेटर, तसेच १७ पुरुष वेटरसह बार मॅनेजर, गायक अशा ५४ जणांना ताब्यात घेतले आहे.
नवी मुंबई शहरातील अनेक लेडीज बार वेळेपेक्षा अधिक वेळ चालवून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. तसेच अनेक बारमध्ये महिला वेटरकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गैरकृत्य करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील नियमभंग करणाऱ्या सर्व बारची पोलिसांनी झाडाझडती सुरू केली आहे. रबाळे एमआयडीसीतील मायरा ऑर्केस्ट्रा बारवर शनिवारी (ता. ३) पहाटे दोनच्या सुमारास पाहणी केली असता अश्लील हावभाव होत असल्याचे दिसून आले होते. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे.