बालकांनी दिला टाकाऊतून टिकावूचा धडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालकांनी दिला टाकाऊतून टिकावूचा धडा
बालकांनी दिला टाकाऊतून टिकावूचा धडा

बालकांनी दिला टाकाऊतून टिकावूचा धडा

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : अरबी शब्द ‘नजाफत’चा अर्थ आहे स्वच्छता! अशाच स्वच्छतेचा वसा घेत प्लास्टिकच्या वापराला नाही म्हणत भेंडी बाजारातील ‘अल् सदाह’ सोसायटीतील लहान मुलांनी पर्यावरण रक्षणाचे धडे घेतले आहेत. सोसायटीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत लहान मुलांच्या ‘नजाफत स्टार्स’ टीमसाठी पर्यावरणपूरक वस्तूंचा रोजच्या जीवनात कसा वापर करावा यासाठी एक उपक्रम राबविला. त्यामध्ये इमारतीतील लहान मुलांनी सहभाग नोंदविला.

‘नजाफत स्टार्स’ म्हणजे ‘अल् सदाह’ सोसायटीत राहणाऱ्या ८ ते १५ वयोगटातील मुलांचा एक गट. सर्व मुले पर्यावरणपूरक कृतींना प्रोत्साहन देतात. कचरा वेगळा करणे आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्याबाबत समाजात जनजागृती करतात. रमजानमध्ये खजुरांच्या बिया गोळा करणे आणि कॉफी बनवण्यासारख्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये भाग घेतात. स्वतः पुढाकार घेऊन घरोघरी जाऊन वर्तमानपत्रासारखे पुनर्वापर करण्यायोग्य साहित्य गोळा करतात. पर्यावरण दिनानिमित्तही सोसायटीने एक उपक्रम राबविला. ज्यात १५ मुले आणि तीन पालकांनी सहभाग नोंदविला. सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेन्ट ट्रस्टने पर्यावरणपूरक काम करणाऱ्या लहान मुलांच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

वृक्षारोपण करणे कार्यशाळेचा उद्देश होता. त्यामध्ये प्रत्येक मुलाने दोन रोपे घेतली आणि बागेच्या परिसरात लागवड केली. ‘अल् सदाह’च्या रहिवाशांनी कचऱ्यात टाकून दिलेल्या वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या मुलांनी गोळा केल्या. त्या बाटल्या कापून त्यांना आकर्षक रंग देऊन त्यात माती आणि पाणी भरले. मुलांनी त्यात रोपे लावली. आपल्या कृतीततून टाकाऊतून टिकाऊचा संदेश लहान मुलांनी सोसायटीच्या नागरिकांना दिला.