पोलिस उप आयुक्तांवर कारवाईचे आदेश

पोलिस उप आयुक्तांवर कारवाईचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : रामनवमी उत्सवाच्या दिवशी मालवणी परिसरात झालेल्या हिंसेप्रकरणी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने मुंबई पोलिस आयुक्तांना पोलिस उपायुक्त अजय बंसल यांच्यावर कारवाई करायचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र लिहून कारवाईचे आदेश दिले आहेत. उपायुक्त अजय बंसल यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे अल्पसंख्याक आयोगाने म्हटले आहे.

मालवणी येथे रामनवमीनिमित्त ३० मार्च रोजी रात्री शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भाजप युवा मोर्चा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेदरम्यान दोन गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होती. दोन गटांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतरही सर्व सुरळीत न झाल्यामुळे पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. सुमारे ३०० हून अधिक अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी २५हून अधिक आरोपींना अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com