तिघांविरोधात खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

तिघांविरोधात खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

अंधेरी, ता. ४ (प्रतिनिधी) ः खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध एमएचबी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यापैकी एकाचे नाव गंगा कुंचीकुर्वे असून त्याच्या दोन सहकाऱ्यांची नावे समजू शकली नाही. गंगा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याची परिसरात प्रचंड दहशत असल्याचे बोलले जाते.

तक्रारदार नालासोपारा येथे राहत असून ते गेल्या सहा महिन्यांपासून दहिसर येथे एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. काही दिवसांपूर्वी गंगा कुंचीकुर्वे याने त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. पैसे दिले नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. त्यानंतर तो त्यांना फोनवरुन खंडणीसाठी सतत धमकी देत होता. शुक्रवारी २ मे रोजी गंगा हा त्याच्या दोन सहकाऱ्यांसोबत आला होता. यावेळी त्याने मॅनेजरला दमदाटी करुन चाकूचा धाक दाखवून पुन्हा पैशांची मागणी केली. दारू आणि पैसे दिले नाहीतर तुला आज संपवून टाकतो, अशी धमकी दिली होती. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर या तिघांनी तिथे गोंधळ घालून हॉटेलच्या समानाची तोडफोड करण्यास सुुरुवात केली होती. हा प्रकार हॉटेलच्या मालकाला समजताच त्यांनी एमएचबी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तिथे गंगासह इतर दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या तिघांविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पळून गेलेल्या या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com