तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी दोघांना अटक

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी दोघांना अटक

अंधेरी, ता. ४ (प्रतिनिधी) ः लग्नास नकार दिल्याने तब्बसूम शब्बीर कनाडिया या तरुणीने आत्महत्या केली होती. याप्रकरणी तिच्या प्रियकरासह त्याच्या बहिणीला अटक करण्यात आली आहे.
अमान तौकीर अहमद अन्सारी आणि तरन्नूम तौकीर अहमद अन्सारी अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली होती.

तब्बसूम कनाडिया हिने ६ मे रोजी उंदीर मारण्याचे औषध प्राषण केले होते. तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. अमान अन्सारी हा सहा महिन्यांपासून तिला लग्नास नकार देत होता. तसेच तिच्याशी संपर्कही करत नव्हता. अमानकडून फसवणूक झाल्याचे सांगत तिने ५ मे रोजी पोलिसांत तक्रारही केली होती. त्यानंतर ती मानसिक तणावात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातून आलेल्या नैराश्यातूनच तिचे आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. उपचारादरम्यानही तरन्नूमने तिला फोन करुन अमान तिच्याशी लग्न करणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे तिची प्रकृती आणखी बिघडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईने अमानसह त्याची बहिण तरन्नूमविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल होताच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com