वसई-दिवा रेल्वे मार्गावरील उड्डाणपूलाचे भूमिपूजन

वसई-दिवा रेल्वे मार्गावरील उड्डाणपूलाचे भूमिपूजन

नालासोपारा, ता. ४ (बातमीदार) : वसई-दिवा रेल्वे मार्गावरील टीवरी रेल्वे फटकावर दोन मार्गिकेच्या उड्डाणपुलाचे रविवारी (ता. ४) सायंकाळी ५ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन झाले. वसई-नायगावला जोडणाऱ्या या फाटकावरील उड्डाणपुलामुळे परिसरातील स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळून वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
सेतुबंधन योजनेअंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे फाटकमुक्त भारत ही संकल्पना राबवून रविवारी राज्यातील ११ ठिकाणी उड्डाणपुलाचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन केले. या ११ उड्डाणपुलांमध्ये पालघर जिल्ह्यातील वसई-दिवा रेल्वे स्थानकादरम्यानचा टीवरी रोडवरील रेल्वे फाटक क्रमांक १० येथील दोन मार्गिकेचे ऑनलाईन भूमिपूजन केले आहे. या मार्गिकेच्या प्रकल्पाची अंदाजित रक्कम ७७.७० कोटी असून ६४० मीटर लांबीचा उड्डाण पूल आहे.
नव्याने निर्माण होणारे नायगाव पूर्व आणि वसईला जोडणारे हे फाटक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com