
आधारवाडी जेलमध्ये कायद्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन
डोंबिवली, ता. ५ (बातमीदार) : रोटरी क्लब ऑफ कल्याण, टायगर कल्याण केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन व आयुर हॉस्पिटल कार्डिक केअर यांच्या संयुक्त विद्यमाने आधारवाडी जेलमध्ये मेगा मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरासाठी ऑल इंडिया केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, या आरोग्य शिबिरामध्ये जवळपास ६०० कैद्यांनी आपली तपासणी करून औषध घेतले. या शिबिरामध्ये रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर कैलास जेठानी यांनी जेल अधीक्षक यांचे आभार मानले. या वेळी जेल अधीक्षक राजाराम भोसले यांनी आपल्या भाषणात आरोग्य शिबिर आयोजित केल्यामुळे त्यांनी रोटरी क्लबचे आभार मानले. या वेळी रोटरीचे जिल्हा सचिव माधव चिकोडी, डॉ. राजन माने. डॉ. धर्मेंद्र उपाध्याय, डॉ. विद्याधर गांगण, संदीप चौधरी, चंद्रकांत देव, भूषण कोठावदे, रोटरीचे अध्यक्ष विजय भोसले, सचिव सुनील डाळिंबे, खजिनदार मितेश कलंबे आदी उपस्थित होते.