रामचंद्र गडग यांचा सेवापूर्ती समारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामचंद्र गडग यांचा सेवापूर्ती समारंभ
रामचंद्र गडग यांचा सेवापूर्ती समारंभ

रामचंद्र गडग यांचा सेवापूर्ती समारंभ

sakal_logo
By

कासा, ता. ६ (बातमीदार) : सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र बाबू गडग यांचा सेवापूर्ती कार्यक्रम वणई येथे नुकताच पार पडला. गडग यांनी वाणगाव येथे आयटीआयचे शिक्षण पूर्ण करून पुढे भारत पेट्रोलियममध्ये काही वर्षे काम केले. नंतर एमएसईबी, बोरिवली येथे ३१ वर्षे नोकरी करून ते प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. नोकरी करत असताना त्यांनी सामाजिक, शैक्षणिक कार्य चालूच ठेवले. आदिवासी चळवळींमध्ये त्यांचा सतत सहभाग होता. तसेच गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, शालेय शुल्क व इतर शैक्षणिक मदत केली आहे. सेवानिवृत्ती कार्यक्रमात त्यांचा लहान मुलगा डॉ. स्वप्नील गडग यांचा साखरपुडा उत्साहात पार पडला. या वेळी बालाजी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. गोपाळ घुगे, शिंदे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. स्वप्नील शिंदे, महेंद्र पवार, नीलेश कासट, शिक्षक रमेश माळी, जानू भावर, विलास चिपात, माजी सैनिक कृष्णा बसवत, दिनेश मोर, भास्कर कोठारी, प्रताप सांबर, विलास सुमडा तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, नातेवाईक व कुटुंबीय उपस्थित होते.