‘स्वच्छ नवी मुंबई’ला हरताळ

‘स्वच्छ नवी मुंबई’ला हरताळ

नेरूळ, ता. ५ (बातमीदार)ः नवी मुंबई पालिकेने ‘स्वच्छ भारत अभियान २०२३’ मध्ये प्रथम क्रमांकासाठी कंबर कसली आहे. शहरात पालिकेने कचराकुंडीमुक्त संकल्पना राबवली आहे. टप्प्याटप्प्याने ही संकल्पना पालिका प्रशासनाने नवी मुंबई शहराच्या प्रत्येक विभागात राबवली आहे, पण या निर्णयामुळे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावरच कचरा टाकल्यामुळे ‘स्वच्छ नवी मुंबई’ची संकल्पना फोल ठरली आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वीच्या कामांना वेग आला आहे. अपघातांचा धोका लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर झाडांची छाटणी केली जात आहे, परंतु अनेक ठिकाणी या फांद्या तोडून पदपथ तसेच उद्यानाच्या बाहेर टाकल्या गेल्या आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. नेरूळ सेक्टर १०, ८, २, ४ या परिसरामध्ये जागोजागी पदपथांवर फांद्या टाकल्याचे चित्र आहे. त्यामुळे आधीच पार्किंगमुळे चालण्यासाठी जागा नसताना पदपथांवरील झाडांच्या फाद्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
--------------------------------------------
दुर्गंधीसह डासांचा उपद्रव
तोडलेल्या झाडांच्या फांद्यांच्या ठिकाणी नागरिक घरातील कचरादेखील आणून टाकत आहेत. त्यामुळे परिसराला बकाल स्वरूप आले आहे. या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या कॅरिबॅग, रात्रीचे शिळे अन्न असल्यामुळे पावसात हा कचरा कुजण्याची शक्यता असून दुर्गंधी तसेच डासांचा उपद्रव वाढला आहे.
--------------------------------------------
शहरात जागोजागी कचराकुंड्या कमी करण्यात आल्या आहेत. नेरूळ सेक्टर १० येथे रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. यामुळे परिसराला बकाल स्वरूप आले असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
- पूजा पवार, नागरिक
----------------------------------------------
शहर कचराकुंडीमुक्त करण्याचा संकल्प आहे. त्यानुसार कचराकुंड्या हटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक भान जपत कचऱ्याची गाडी आल्यानंतर कचरा टाकणे अपेक्षित आहे.
- बाबासाहेब राजळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com